महिलेने घेतले नाही कॉल – घरात घुसून केली अंगलट

जळगाव : मध्यरात्री महिलेला वारंवार फोन करुन देखील तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिच्या घरात घुसून तिच्याशी अंगलट करणा-या इसमाविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील के.सी.पार्क परिसरात हा प्रकार घडला आहे.

जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावर एक महिला राहते. तिला रात्री 11.50 वाजेपासून त्याच्या मोबाईलवरुन महिलेला फोन केले. मात्र तिने त्याच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. 14 जुलैच्या रात्रप्रहरी साडेबारा ते पाऊन वाजेच्या सुमारास त्याने थेट महिलेचे घर गाठले. त्याने तिच्या घराच्या कंपाऊंड वॉलवरुन उडी मारुन तिचा लोटलेला दरवाजा उघडून तिची भेट घेतली. त्याने तिच्यासोबत अंगलट सुरु करुन तिचा विनयभंग केला. त्यामुळे पहाटेच्या प्रहरी साडे तिन वाजेच्या सुमारास महिलेने जळगाव शहर पोलिस स्टेशन गाठून त्याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.न. 206/23 भा.द.वि. 354, 354 (ड), 452 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक रमेश शेंडे करत आहेत.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here