जळगाव : अनोळखी इसमाच्या खून प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील लहासर गावाच्या वनविभागाच्या सागवानी जंगलातील नाल्यात अनोळखी इसमाचा मृतदेह 17 जुलै रोजी दुपारी आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मयताचे वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील आहे.
कुणीतरी अज्ञात इसमाने या अज्ञात इसमाला काहीतरी अज्ञात कारणावरुन जीवे ठार केले आहे. जिवे ठार केल्यानंतर मयताला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सुती पोत्यात कोंबून त्या पोत्याच्या तोंडावर प्लॅस्टिकची गोणी लावलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आला. या घटने प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला पोलिस कर्मचारी निलेश घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग 5 गु.र.न. 329/23 भा.द.वि. 302, 201 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. किरण शिंदे करत आहेत.