मजुराचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

जळगाव : जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील मजुराचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. किशोर श्रावण मराठे असे मरण पावलेल्या मजुराचे नाव आहे. किशोर मराठे हा हात-पाय धुण्यासाठी नदीपात्रात गेला असता ही दुर्घटना सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आपत्तीव्यवस्थापन पथकाला यश आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मातमृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

आज सकाळी किशोर मराठे हा चाळीस वर्षचा तरुण गिरणा नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेला होता. दरम्यान अचानक पाय घसरल्याने किशोर मराठे हा तरुण पाण्यात बुडू लागला. दरम्यान त्याठिकाणी काही महिला कपडे धुण्यास आल्या होत्या. त्यांचे लक्ष पाण्यात बुडणा-या किशोर मराठे याच्याकडे गेले. महिलांच्या सतर्कतेने घटनास्थळी गावकरी आणि पोलिस मदतीला धावून आले. मात्र दरम्यानच्या कालावधीत किशोर मराठे हा पाण्यात बुडालेला होता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनकामी रवाना करण्यात आला. एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here