पो.नि. राहुल गायकवाड यांच्याविरुद्ध पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणी गुन्हा  

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांच्यासह इतर दोघांविरुद्ध पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. राहुल गायकवाड आणि पोलिस नाईक तुषार पाटील या दोघांच्या प्रोत्साहनाखाली खासगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला याने पाच लाखांच्या रकमेपैकी तिन लाख रुपये तक्रारदाराकडून स्विकारले. रक्कम स्विकारताच दबा धरुन बसलेल्या धुळे युनिटच्या एसीबी पथकाने पुढील कारवाई केली आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात सह आरोपी न करण्याकामी पो.नि. राहुल गायकवाड व पोलिस नाईक तुषार पाटील यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे खासगी पंटर ऋषी शुक्ला याने पाच लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती.  त्यापैकी तिन लाख रुपये पंचासमक्ष स्विकारतांना खासगी पंटर सापडला. याप्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here