बेपत्ता मुलाचा गळा कापून खून उघडकीस

नाशिक : बेपत्ता असलेल्या नऊ वर्षाच्या मुलाचा गळा कापून खुन झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटने प्रकरणी सुरुवातीला वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनला गु.र.न. 224.23 भा.द.वि. 363 नुसार फुस लावून पळवून नेल्याचा अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नंतर त्याचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी खूनाचे कलम वाढवण्यात आले आहे.

दिनांक 16 जुलै 2023 रोजी वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील पोहाणे, ता. मालेगाव येथील रहिवासी अनिल फुलसिंग सोनवणे यांचा नऊ वर्षांचा मुलगा कृष्णा अनिल सोनवणे हा शेतात खेळण्यासाठी गेला होता.  त्यानंतर तो पुन्हा घरी परत आला नाही. दरम्यान पोहाणे शिवारात मांजरी नाला परिसरातील शेतात दुर्गंधीयुक्त वास येण्यास सुरुवात झाली. पोलीस पथकाने मालेगाव तहसीलदारांसह घटनास्थळी जावून पाहणी केली. त्याठिकाणी एका खड्ड्यात पालथ्या अवस्थेत अर्धवट पुरलेला मुलाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह बेपत्ता बालक कृष्णा अनिल सोनवणे हाच असल्याचे निष्पन्न झाले. मालेगावचे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे सपोनि मनोज पवार पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here