गुप्तधनाच्या लालसेपोटी बालकाचा खून उघडकीस

नाशिक : गुप्तधनाच्या लालसेपोटी वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशन हद्दीत नऊ वर्षाच्या बालकाचा गळा कापून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सुरुवातीला वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनला बालकास पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथील अनिल फुलसिंग सोनवणे यांचा नऊ वर्ष वयाचा मुलगा कृष्णा अनिल सोनवणे हा 16 जुलै रोजी खेळण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परत आला नव्हता. त्यानंतर 18 जुलै रोजी परिसरातील दुर्गंधीमुळे हा खून उघडकीस आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील आणि वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. मनोज पवार यांच्या पथकाने या गुन्ह्याचा शोध लावला आहे. उमाजी गुलाब मोरे (रा. पोहाणे मांजरी नाला शिवार ता. मालेगाव) या संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्याचे साथीदार रोमा बापू मोरे, रमेश लक्ष्मण सोनवणे, गणेश लक्ष्मण सोनवणे, लक्ष्मण नवल सोनवणे, (सर्व रा. पोहाणे, मांजरी नाला शिवार ता. मालेगाव) यांनी मिळून कृष्णा अनिल सोनवणे याला फुस लावून पळवून नेण्यात आले होते. धारदार चाकू व ब्लेडने त्याच्या गळ्यावर वार करुन त्याला जीवे ठार करण्यात आले होते. गुप्तधनाच्या लालसेपोटी बालकाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास येत आहे. लक्ष्मण सोनवणे वगळता चौघांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयीतांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकाला पंधरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करुन अभिनंदन केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here