धनादेश अनादर प्रकरणी कृपाण शेती सेवालयच्या आनंद कृपाणला शिक्षा

जळगाव दि.२४ प्रतिनिधी – जळगाव च्या जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीला खात्यात पैसे नसताना ७ लाख ८४ हजार १९५ रूपयांचा धनादेश गोंदिया येथील कृपाण शेती सेवालय या फर्मचे प्रो. प्रा. आनंद कवडूजी कृपाण यांनी दिला होता. हा धनादेश अनादर झाला.

याप्रकरणी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगावच्यातर्फे कैलास नागोलाल अग्रवाल यांनी फिर्याद दाखल केली व साक्ष नोंदवली. फिर्यादी कंपनीचे वकील म्हणून अॅड. निशांत सुशील अत्रे यांनी काम पाहिले. दि.१८ जुलै ला अंतिम सुनावणी झाली. त्यात ७ लाख ८४ हजार १९५ रूपयांचा धनादेश अनादर झाल्याने न्यायालयाने आरोपीस एन.आय.अॅक्ट मधील तरतुदीखाली दोषी धरले. एक वर्षाचा साधा कारावास व रक्कम १० लाख रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रक्कमेपैकी ९ लाख रूपये एवढी रक्कम फिर्यादी कंपनीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशसुध्दा केलेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here