आशियाड भारतीय सॉफ्टबॉल संघात सई जोशीची निवड

जळगाव : आगामी आशियाडसाठी भारताच्या सोळा सदस्यीय महिला सॉफ्टबॉल संघात जळगाव येथील आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू सई अनिल जोशी हिची निवड झाली आहे. सई जोशी हिच्यासह महाराष्ट्राच्या पाच महिला खेळांडूनी देखील भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

चीन मधील हांगझू या शहरात हे सामने सप्टेबर – ऑक्टोबर दरम्यान खेळले जाणार आहेत. या सामन्यांमधे सॉफ्टबॉल या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. आशियाड स्पर्धेत सहभाग मिळवणारी सई जोशी ही खान्देशातील खेळाडू ठरल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. एस. एस. मनियार लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असलेली सई ही जैन इरिगेशनचे मिडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी यांची कन्या आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी सई जोशी हिचे कौतुक केले असून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here