जळगाव शहरातील के.सी. पार्क परिसरात गोळीबार

जळगाव : जळगाव शहराच्या के.सी. पार्क परिसरातील त्रिभुवन कॉलनीत आज 27 जुलैच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी मोठा आवाज झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.

के.सी.पार्क परिसरातील त्रिभुवन कॉलनीत राहणा-या अशोक माने यांच्या घरावर दगडफेकीसह गोळीबार झाल्याचे समजताच जळगाव शहर पोलिस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा आदींच्या पथकासह अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत आदींनी आपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी दोन ते तिन वेळा गोळीबार झाल्याचे दिसून आले आहे. जुन्या वादातून अज्ञात इसमांनी हा प्रकार केल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत सुदैवाने कुणी जखमी झाले नसून गोळीबारासह दगडफेक करणा-यांचा शोध सुरु असून त्याकामी पोलिस पथक रवाना झाले आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here