अ‍ॅसीड टाकण्याची धमकी देत शाळकरी मुलीचा विनयभंग

जळगाव : शाळेत जाणा-या अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करुन तिला आपल्यासोबत चलण्याचा आग्रह आणि लग्न करण्याची तसेच अ‍ॅसीड टाकण्याची धमकी देणा-या मुलाविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत मुलाच्या अशा बोलण्यासह धमकीला वैतागून तिने हा प्रकार घरी आपल्या आईला कथन केला.

पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने पाचोरा पोलिस स्टेशनला जावून हा सर्व प्रकार सांगितला. आपण ज्या मुलीला त्रास देत आहोत ती मागास समाजाजाची असल्याचे माहिती असून देखील त्रास देणा-या भिन्नधर्मीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे करत आहेत.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here