गोळीबार करणारे दोन्ही गटातील गुन्हेगार अटकेत

जळगाव : जळगाव शहरात गोळीबार करणा-या दोन्ही गटातील तरुणांना स्थानिक गुन्हे शाखा,  जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे. चोवीस तासांच्या आत गोळीबार करणा-या गटाला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पहिल्या गुन्हयातील संशयीत आरोपी लखन दिलीप मराठे उर्फ गोलू, लक्ष्मण शिंदे, नरेश शिंदे (रा. शिवाजी नगर हुडको जळगाव),  उमाकांत धोबी (रा. संत मिराबाई नगर जळगाव),  समीर शरद सोनार (रा. फॉरेस्ट कॉलनी जळगाव), राजेश उर्फ बंटी सदाशिव बांदल (रा. उस्मानीया पार्क जळगाव) आदींना ताब्यात घेण्यात आले आहे.    दुस-या विरोधी गुन्ह्यातील संशयीत आरोपी शुभम अशोक माने, मयुर अशोक माने (दोघे रा. के.सी. पार्क जळगाव) अशांना ताब्यात घेण्यात आले.

जळगाव शहराच्या शिवाजीनगर भागातील के.सी. पार्क परिसरात दोन गटात वाद होवून गोळीबार झाल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक निलेश वतपाळ, हे.कॉ. विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, महेश महाजन, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, विजय पाटील, हेमंत पाटील, दिपक शिंदे, रमेश जाधव यांचे एक पथक तयार करण्यात आले. याशिवाय जळगाव शहर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. रविंद्र बागुल, हे.कॉ.उमेश भांडारकर, तेजस मराठे, रतन गिते, योगेश पाटील, भास्कर ठाकरे आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे यांचे दुसरे पथक तयार करण्यात आले होते.

पुढील तपास कामी अटकेतील संशयीतांना जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले होते. अटकेतील सर्वांना न्यायालयात हजर केले असता पहिल्या गुन्ह्यातील सहा संशयीतांना पाच दिवस व दुस-या विरोधी गुन्ह्यातील दोघांना तिन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली अअहे. या गुन्ह्याचा तपास पो.नि.विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रविंद्र बागुल करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here