घरफोडी करणारे परप्रांतीय जेरबंद

जळगाव : घरफोडी करणा-या दोघा परप्रांतीय अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे गुन्हे अटकेतील दोघांकडून उघडकीस आले आहेत.  बंटी कुमार पंचानंद सिंग आणि विजय देवचंद चंद्रवंशी  अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

जळगाव शहरातील नवीपेठ परिसरातील आयफोनवाला हे मोबाईल विक्रीच्या दुकानासह इतर ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. तांत्रीक तपासासह गोपनीय माहितीनुसार हे गुन्हे बंटीकुमार आणि विजय चंद्रवंशी या दोघा परप्रांतीयांनी केल्याचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजले. पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलीस अंमलदार स.फौ. रवि नरवाडे, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेका संदिप पाटील, पोना प्रविण मांडोळे, पोहेकॉ संदिप साळवे, पोना ईश्वर पाटील, चालक पोकॉ महेश सोमवंशी, चापोकॉ. प्रमोद ठाकुर, चालक पोकॉ मोतीलाल चौधरी आदींनी या गुन्ह्याचा शोध लावून दोघांना अटक केली. पुढील तपासकामी दोघांना जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सखोल चौकशीअंती अटकेतील दोघांनी जळगाव शहरासह मध्यप्रदेशातील रतलाम, झारखंड राज्यातील रांची, गुजरात मधील सुरत आदी मोठ्या शहरात घरफोड्या केल्याची कबुली दिलीआहे. दोघांकडून वेगवेगळ्या राज्यातीलबनवट आधार कार्ड आणि चोरी केलेले अ‍ॅपल कंपनीचे माहगडे तिन मोबाईल आणि 97 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. अटकेतील दोघांविरुद्ध सुरत शहरात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अटकेतील बंटी कुमार हा सुरत येथील तिन गुन्ह्यांमधे फरार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here