दोन तासात मोबाईल चोरटा जेरबंद

जळगाव : बस स्थानकातून प्रवाशाचा मोबाईल चोरणा-या चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली. याशिवाय 48 तासाच्या आत त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र देखील न्यायालयात सादर करण्यात आले आहे. साजित खान मुनव्वोर खान असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे.

गोकुळ सुभाष घाटे हा विद्यार्थी जामनेर येथे जाण्यासाठी जळगाव बस स्थानकात बसची वाट बघत होता. दरम्यान कुणीतरी त्याचा मोबाईल चोरी केला. मोबाईल चोरी झाल्यानंतर त्याने जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या गुन्हे शोध पथकातील  पोहेकॉ सलिम सुभान तडवी, पोकॉ. रविंद्र साबळे, पोकॉ. तुषार पाटील, कैलास शिंदे, जयेश मोरे तसेच या गुन्ह्याचे तपासी अंमलदार कमलेश पवार आदींनी या गुन्ह्याचा शोध लावून मोबाईलसह चोरट्यास अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here