अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जीवे ठार करण्याचा प्रयत्न  

जळगाव : चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-याविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीने अत्याचार करणा-यास विरोध केला असता त्याने तिच्या डोक्यावर दगड मारुन तिला गंभीर दुखापत केली. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता विरोध केला म्हणून तिचा दोरीने गळा आवळून तिला जीवे ठार करण्याचा प्रयत्न आणि चापटा बुक्क्यांनी मारहाणीचा प्रकार झाला.

पारोळा नजीक धुळपिंप्री गावाच्या नदी पात्रात 11 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. अत्याचार करणा-याविरुद्ध पिडीत अल्पवयीन मुलीच्या भावाने पारोळा पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 341/23 भा.द.वि. 307, 376 (3), 354, 323, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायदा कलम 4,8,10,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राजु जाधव करत आहेत.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here