होस्टेलमधील विद्यार्थिनीसोबत अत्याचार – दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : जळगाव शहरातील एका प्रथितयश महाविद्यालयात शिक्षण घेणा-या तरुणीसोबत केलेल्या अत्याचारप्रकरणी दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शब्बीर मण्यार आणि इकबाल गौस मोहम्मद खान अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघे विद्यार्थी अनुक्रमे साक्री जिल्हा धुळे आणि पाथरी जिल्हा परभणी येथील मुळ रहिवासी असून ते सध्या शिक्षणानिमित्त मोहाडी रोडवरील लायन्स हॉल परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे खळबळ माजली आहे.

शैक्षणीक प्रोजेक्ट तयार करण्याच्या निमित्ताने अगोदर इमरान याने विद्यार्थीनीला त्याच्या रुमवर बोलावले. विद्यार्थिनी त्याच्या रुमवर आली असता त्याने तिचा मुका घेत सेल्फी काढला. आता हा फोटो तुझ्या मित्रपरिवारासह नातेवाईकांना शेअर करेन असे म्हणत त्याने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरु केला. धमकीला बळी पाडण्यात यशस्वी झाल्यानंतर त्याने तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले.  

त्यानंतर अजून एक आक्षेपार्ह फोटो मित्र इकबाल याच्याकडे असल्याची धमकी देत त्याने तिच्यासोबत वेळोवेळी कधी रुमवर तर कधी अजिंठा चौफुली नजीक एका प्रसिद्ध हॉटेलच्या रुमवर बोलावून शरीरसंबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. रोहीदास गभाले करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here