स्वातंत्र्यदिनाच्या हिंदू-मुस्लीम बांधवांनी दिल्या शुभेच्छा

जळगाव : स्वातंत्र्य दिनानिमीत्त जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तांबापुरा परिसरातील शहीद अब्दुल हमीद चौकात आयोजीत कार्यक्रमात हिंदू मुस्लीम ऐक्याचा प्रसंग यावेळी दिसून आला.

याप्रसंगी देशभक्तीपर गितांचे गायन झाले. तसेच लहान मुलांना मिठाईसह चॉकलेट आणि बिस्किटांचे वितरण करण्यात आले. देशभक्तीपर गितगायनासह हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणांसह औलिया मशिदीच्या मदरशातील मुलांची तिरंगा रॅली काढण्यात आली. मदीना चौक तांबापुरा ते बिलाल चौक, शहीद अब्दुल हमीद चौकातून काढण्यात आलेल्या या रॅलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.   याप्रसंगी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सय्यद, नाना तायडे, इमरान बेग, किरण पाटील आदींसह बदर भाऊ, शाह ओलिया मशिदीचे सदर हनीफ शाह बापू, इमाम साहिब आदींची उपस्थिती होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here