मुंबई : देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन व अनलॉकची प्रक्रिया कमी अधिक प्रमाणात सुरु आहे. हव्या त्या प्र्माणात अजूनही लॉकडाऊन संपलेले नाही. त्याचा परिणाम देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. गेल्या सहा महिन्यापासून लॉकडाऊनचे सत्र सुरुच आहे.
पुढील महिन्यात लॉकडाऊनचे निर्णय मागे घेतली जाण्याचे संकेत ठाकरे सरकारकडून मिळत आहेत. बुधवारी महाविकास आघाडी सरकारची बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनमधून राज्यातील जनतेची सुटका होण्याच्या विषयावर भर दिला जाईल.केंद्राने रस्ता वाहतुकीस परवानगी दिली असली तरी राज्यातील परिस्थिती वेगळी असते.
त्यामुळे वाहतुकीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. लॉकडाऊनच्या विळख्यातून जनतेला बाहेर काढण्याचा कल ठाकरे सरकारकडून बुधवारी होणा-या बैठकीत अपेक्षीत असून तसे संकेत मिळत असल्याचे समजते.