बनावट नोटा चलनात आणणा-या दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा कब्जात बाळगत त्या चलनात आणणा-या दोघांविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण नंदलाल जैस्वाल (मध्य प्रदेश) आणि राधेशाम शरद जाखेटे (रा. वडगाव बु. ता. चोपडा ह.मु फॉरेस्ट कॉलनी जळगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

विजय प्रकाश बडगुजर हे धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानावर ग्राहक म्हणून आलेल्या दोघांकडून पाचशे रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. पाचशे रुपये दराच्या 27 नोटा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील तपास स.पो.नि. जिभाऊ पाटील करत आहेत.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here