जळगाव : जळगाव शहरातील गणपती हॉस्पीटलचे संचालक डॉ. शितल स्वरुपचंद ओसवाल यांना धनादेश अनादर प्रकरणी दाखल तिन खटल्यात पन्नास लाख रुपयांचा दंड आणि प्रत्येकी एक वर्ष तुरुंगवास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्या.जान्हवी केळकर यांनी हा निकाल दिला आहे.
अनिल तोताराम शिरसाळे आणि त्यांची पत्नी असे दोघे जण गणपती हॉस्पीटल मधे सन 2002 पासून लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. वर्षानुवर्षे सेवा दिलेल्या सेवेपोटी या दाम्पत्याला डॉ. शितल ओसवाल यांनी पगारापोटी 55 लाख रुपयांचे धनादेश दिले होते. धनादेश दिल्याबाबत एक पत्र सोबत दिले होते. देण्यात आलेल्याधनादेशापैकी दहा लाख रुपयांचे दोन आणी पाच लाख रुपयांचा एक धनादेश वटला नाही. त्यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयीन दाद मागितली.
प्रथमवर्ग न्या. जान्हवी केळकर यांच्यासमक्ष या तिघा खटल्यांचे कामकाज सुरु होते. त्यात डॉ. ओसवाल दोषी आढळून आल्यानंतर तिघा खटल्याअत त्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास तिन महिन्यांची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.