गोमांस वाहतुकीचा संशय – पाळधीत पेटवला ट्रक

जळगाव : ट्रकमधून गोमांस वाहतुक होत असल्याचा आणि संशयीत ट्रकसह चालक पसार होत असल्याचा संशय आल्याने संतापात ट्रक पेटवून दिल्याची घटना पाळधी परिसरात घडली. गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली होती.

बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालय नजीक महामार्गावरील पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास इंधन भरण्यासाठी एका ट्रकचे आगमन झाले. त्या ट्रकमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे गोमांसाची वाहतुक होत असल्याचा संशय काही जणांना आला. ट्रक चालकास विचारपूस केली असता त्याने व्यवस्थित उत्तरे दिली नाही . त्यामुळे या ट्रकमधे गोमांस असल्याचा संशय अजून बळावला. हा प्रकार पाळधी दुरक्षेत्र येथे कळवण्यात आला. पाळधी ओ.पी. चा एक कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाला.

एवढे झाल्यानंतर ट्रक चालकास ट्रक पाळधी ओपीमधे नेण्यास सांगण्यात आले. दरम्यान ट्रक पाळधी दूरक्षेत्राच्या दिशेने न जाता बायपासने जात असल्याचे बघून तरुणांच्या मनात ट्रक चालक ट्रकसह फरार होत असल्याचा संशय बळावला. मागेमागे येत असलेल्या तरुणांनी ट्रक अडवून चालकास मारहाण करत ट्रक पेटवून दिली. हा प्रकार समजल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्यासह वादाची घटना घडली. त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पाळधी येथील वातावरण आटोक्यात असून पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here