अपघात घडवून लुट करणा-या दोघांना पोलिस कोठडी

जळगाव : तरुणाच्या दुचाकीला ठोस मारुन वाद घालून त्याची लुट करणा-या चौघांपैकी दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. अटकेतील दोघांना न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राहुल नाना राजपूत आणि रितेश भिकन चौधरी (दोघे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

15 ऑगस्टच्या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तारिक अल्ताफ खाटीक हा तरुण मेहरुण तलावावर दुचाकीने फिरण्यास गेला होता. त्यावेळी चौघा जणांनी त्याच्या दुचाकीला धडक देत त्याला खाली पाडले. अपघात झाल्याचा वाद घालून मारहाण करुन तारिक याच्याकडील मोबाईल आणि इतर वस्तू घेत चौघे फरार झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासाअंती पो.नि. जयपाल हिरे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे चौघांपैकी दोघांना अटक करण्यात आली. दोघांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटार सायकल व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. फरार दोघांचा शोध सुरु आहे.   पो.नि. जयपाल हिरे यांच्यामार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पो.उप.निरी रविंद्र गिरासे, सफौ. अतुल वंजारी, हे.कॉ. इम्रान बेग , सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद , सुधीर साळवे, किशोर पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी आदींनी या तपासकामासह कारवाईत सहभाग घेतला.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here