पत्नीसह तिच्या प्रियकराचा जाच – आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

जळगाव : पत्नीसह तिच्या प्रियकराच्या जाचाला वैतागून पतीने आत्महत्या केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2020 – 2021 या कालावधीत पत्नी व तिच्या प्रियकराचा पतीला जाच सुरु होता. दरम्यान या जाचाला वैतागून सन 2021 मधे त्रस्त पतीने गळफास घेत आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली होती. या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार 21 ऑगस्ट रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहराच्या गेंदालाल मिल भागात राहणा-या तरुणाच्या पत्नीचे परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आपल्या पत्नीचे परिसरातील तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु असल्याची माहिती त्या तरुणाला समजले. त्यामुळे तो तरुण आणी त्याचा भाऊ असे दोघे जण त्या प्रियकर तरुणाला समजावण्यास गेले होते. मात्र त्या प्रियकर तरुणाने दोघा भावांना शिवीगाळ करत धमकी दिली होती. तुझ्या पत्नीसोबत माझे प्रेमसंबंध असून मी एके दिवशी तुझ्या पत्नीला पळवून नेईन, तुझ्याकडून जे होईल ते करुन घे अशी तो प्रियकर तरुण विवाहीत प्रेयसीच्या पतीला फोनवर धमकी देत असे.

पत्नी आणि तिचा प्रियकर तरुण या दोघांच्या जाचाला वैतागून त्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर गेंदालाल मिल भागात राहणारे दोघे प्रेमी सध्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात रहात आहेत. त्या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक रमेश शेंडे करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here