महिलेसह पाच गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार

जळगाव : टोळीने गुन्हे करणा-या महिलेसह एकुण पाच जणांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भावना जवाहरलाल लोढा (रा. अयोध्यानगर, जळगाव टोळी प्रमुख) या महिलेसह अनिल रमेश चौधरी (रा. अयोध्यानगर, जळगाव), सैय्यद सजील सैय्यद हारुन (रा. मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव), सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटवे ऊर्फ बुलेट (रा. मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव) आणि सैय्यद अराफत सैय्यद फारुख (रा.तांबापुरा, जळगाव) अशी हद्दपार करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.  

टोळीने गुन्हे करणारे इसम चौकशीअंती निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरुध्द मुंबई पोलिस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस दलाकडून जिल्हाधिका-यांकडे सादर करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील पाचही आरोपींविरुद्ध हा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला होता. या आरोपींविरुद्ध  एमआयडीसी, जामनेर, भुसावळ बाजारपेठ, पहुर, चाळीसगाव शहर, नशिराबाद व चाळीसगाव रेल्वे पोलिस स्टेशनला एकुण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या पाचही आरोपींविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्यासह त्यांचे सहकारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, निलोफर सैय्यद, चापोना  इम्तियाज खान आदींनी तयार करुन तो पोलिस अधिक्षकांकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मुर्त स्वरुप देण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी केले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here