पाच तासानंतर ढिगा-याखाली सापडला वृद्ध महिलेचा मृतदेह

जळगाव : आज सकाळी जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरात एक जिर्ण इमारत कोसळण्याची घटना घडली. या घटनेत इतर लोक सुदैवाने बचावले मात्र वृद्ध महिला कोसळलेल्या इमारतीखाली अडकल्याने तिचा मृत्यू झाला. राजश्री सुरेश पाठक असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे.

तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने पाठक परिवारावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. जळगाव शहरातील जिर्ण इमारतींचा मुद्दा या घटनेच्या निमित्ताने समोर आला आहे. इमारती जिर्ण झाल्यातरी देखील काही परिवार अशा इमारतीत राहतात. छत्रपती शिवाजी नगर परिसरात पाठक परिवाराच्या मालकीची एक जुनी इमारत आज कोसळली. या इमारतीमधे कुणी रहात नसले तरी पुजा अर्चा करण्यासाठी व पाणी भरण्यासाठी पाठक परिवारातील सदस्य याठिकाणी येत होते. दरम्यान सकाळी राजश्री पाठक या इमारतीत आल्यानंतर इमारत कोसळण्याची घटना घडली. प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर राजश्री पाठक यांचा मृतदेहच हाती लागला. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेले तिघे जण बचावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here