पोलिसाचे परस्त्रीसोबत संबंध? – पत्नीला मारहाण

जळगाव : पोलिस असलेल्या पतीचे परस्त्रीसोबत संबंध असल्याचे पत्नीला समजल्यानंतर वाद झाल्याची घटना अयोध्या नगर  परिसरात घडली. या वादातून पोलिस पतीने त्याच्या पत्नीला मारहाण व शिवीगाळ केली. हा वाद एमआयडीसी पोलिस स्टेशनला जावून भिडल्याने अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात पोलिस पती पत्नी राहतात. पोलिस कर्मचारी पोलिस मुख्यालयात नेमणूकीला आहे. त्याचे परस्त्रीसोबत संबंध असल्याची कुणकुण त्याच्या पत्नीला लागली. त्यातून पत्नीने त्याच्यासोबत वाद घातला. हा वाद वाढत गेल्याने पोलिस पतीने त्याच्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा पत्नीचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस पतीसह त्याचे रामेश्वर कॉलनी भागात राहणारे आई वडील अर्थात पत्नीचे सासु आणी सासरे यांच्याविरुद्ध देखील तक्रार केली. तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. दत्तात्रय बडगुजर करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here