अनोळखी पुरुष मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन

जळगाव : अंदाजे चाळीस वर्ष वयोगटातील अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन एमआयडीसी पोलिस स्टेशनकडून करण्यात आले आहे. 23 ऑगस्ट रोजी सिंधी कॉलनी येथील नागरिकांनी या अनोळखी मयतास तो जीवंत असतांना औषधोपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र औषधोपचार सुरु असतांना त्याने निधन झाले.

वय – 40 वर्ष, रंग – काळा, उंची 5.5 फुट, बांधा सडपातळ, अंगात एक फुल बाहीचा शर्ट पांढ- या रंगाचा त्यावर काळया रंगाचे उभ्या लाईन असलेला असे या मयत इसमाचे वर्णन आहे. याबाबत कुठे मिसींग दाखल असल्यास अथवा कुणाला काही माहिती असल्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनला 0257-2210500 या लॅंड लाईन क्रमांकावर अथवा हे.कॉ. रामकृष्ण पाटील यांच्याशी 9822212170 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here