भुसावळच्या खडसे विरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई

जळगाव : भुसावळ येथील गुन्हेगार चेतन उर्फ गुल्या पोपट खडसे याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची मध्यवर्ती कारागृह मुंबई (ऑर्थर रोड जेल) येथे रवानगी करण्यात आली आहे. सातत्याने सुरू असेलेल्या एमपीडीए अंतर्गत सुरू असलेल्या कारवायांमुळे गुन्हेगारांमधे एक प्रकारची दहशत पसरली आहे. आता आमचा नंबर आहे का अशी भितीयुक्त विचारणा संबंधीत काही गुन्हेगार स्वत:हून पोलिसांना विचारणा करत असल्याचे देखील समजते.

चेतन खडसे याच्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली सहा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्याविरुद्ध चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाया देखील झाल्या आहेत. भुसावळ बाजारपेठ पो.नि. बबन आव्हाड यांच्या निगराणीखाली या कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिस अधिक्षकांनी तो प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिका-यांकडे रवाना केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here