बँक कर्मचारी तरुणीचा चोरुन लपून व्हिडिओ 

जळगाव : बँक कर्मचारी तरुणीचा ग्राहकाच्या रुपात आलेल्या इसमाने लपून व्हिडीओ तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. जळगाव शहरातील गोविंदा स्टॉप परिसरातील एका बँकेत हा प्रकार उघड झाला आहे. व्हिडिओ तयार करणा-या इसमाविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शौकत अली अब्दुल गफ्फार शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्हिडिओ तयार करणा-या इसमाचे नाव आहे. शौकत अली हा मुळ बिहार राज्यातील रहिवासी असून जळगाव शहरातील एका सोने चांदीचे दागिने विक्रीच्या दुकानावर काम करत असल्याचे समजते. त्याने लपून तयार केलेला तरुणीचा व्हिडिओ एका महिलेला व्हॉट्स अॅप च्या माध्यमातून पाठवला होता. त्याने त्या महिलेला हा व्हिडिओ का पाठवला? त्या महिलेचा व त्याचा काय संबंध? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.  दरम्यान 6 सप्टेबर  रोजी दुपारी हा प्रकार लक्षात येताच जमावाने त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार संजय बडगुजर करत आहेत

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here