याद रखेंगे गुप्ताजी – जिल्हाधिका-यांची आरटीआय कार्यकर्ता गुप्ता यांना धमकी?  

जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नेहमी आपल्या सोबत एक फोटोग्राफर ठेवत असल्याचे म्हटले जात आहे. नेहमी सोबत राहणा-या फोटोग्राफरचा तपशील माहितीच्या अधिकारात मागणा-या सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना “याद रखेंगे” असा संदेश मिळाला आहे. स्वत: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना फोनवर बोलतांना दिलेला “याद रखेंगे” हा संदेश नसून ही धमकी असल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे आपल्या सोबत नेहमी फोटोग्राफर ठेवत असल्याचे दीपककुमार गुप्ता यांच्या पाहण्यात आले. यापुर्वी जळगावला सेवा बजावून गेलेले जिल्हाधिकारी आपल्यासोबत फोटोग्राफर ठेवत नव्हते. मात्र विद्यमान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे आपण करत असलेल्या कामाचा लेखाजोखा छायाचित्रांच्या माध्यमातून जतन आणि प्रसारीत करत असल्याचे गुप्ता यांच्या निदर्शनास आले आहे. आपल्या सोबत नेहमी राहणा-या फोटोग्राफरच्या बिलाची अदायगी कुठून होते? कोणत्या शिर्षकाखाली होते? यासह इतर माहिती गुप्ता यांनी माहितीच्या अधिकारात मागितली आहे.

या फोटोग्राफरची नियुक्ती कोणत्या तारखेपासून झाली? या फोटोग्राफरचे नाव काय आहे? त्याच्या नियुक्तीची तारखेसह साक्षांकीत प्रत मिळावी अशी मागणी गुप्ता यांनी माहिती अधिकारात केली आहे. जिल्हाधिकारी महोदयांना भेटण्यासाठी येणारे राजकीय व्यक्तीमत्व, सामाजिक व्यक्तीमत्व, शासकीय अधिकारी अथवा सामान्य जनता यांच्यासोबत काढलेल्या   फोटोवर होणा-या खर्चाचा लेखाजोखा गुप्ता यांनी मागितला आहे. आपण हा तपशील माहितीच्या अधिकारात मागण्याऐवजी तोंडी मागितला असता तर आपण तो लागलीच दिला असता असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुप्ता यांच्यासोबत फोनवर बोलतांना म्हटले आहे. “याद रखेंगे” या धमकीप्रकरणी गुप्ता यांनी स्थानिक पातळीवर पोलिस अधिक्षक आणि वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलिस महासंचालक आदींकडे तक्रार केली आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here