“लय भारी” कुंटणखान्यावर जळगावला धाड – पाच महिलांसह पुरुष ताब्यात

जळगाव : जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील मध्यवर्ती बस स्थानकाच्या मागे चोपडा मार्केट परिसरातील एका लॉजवर टाकण्यात आलेल्या धाडीत कुंटणखाना सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. बनावट ग्राहकाच्या मदतीने हा छापा टाकण्यात आला. चोपडा मार्केट मध्ये “लय भारी” नावाची लॉज वजा हॉटेल असल्याचे समजते. या ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला आहे.

पो.नि. विशाल जायस्वाल यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत पाच महिला आणि काही पुरुष ताब्यात घेण्यात आले आहेत. धाड टाकण्यात आली त्यावेळी परिसरात खळबळ माजली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here