मुलबाळ होण्याचे औषध देण्याच्या नावाखाली लाखो रुपयात फसवणूक

जळगाव : तुमच्या पत्नीला माझ्या औषधाने नक्की मुलबाळ होईल अशा भुलथापा मारुन 6 लाख 69 हजार रुपयात फसवणूक करणा-या जालना जिल्ह्यातील डॉक्टरविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. राहुल पाटील उर्फ योगेश गोसावी असे भोकरदन जिल्हा जालना येथील डॉक्टरचे नाव आहे.

रावेर तालुक्यातील केळी व्यापा-याने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या केळी व्यापा-यास मुलबाळ हवे असल्याने तो डॉ. राहुल पाटील याच्या संपर्कात आला. माझ्याकडे गुणकारी जालीम औषध असल्याची बतावणी या डॉक्टरने केली. त्या औषधीसाठी वेळोवेळी 6 लाख 69 हजार रुपये स्विकारले. मात्र केळी व्यापा-याच्या पत्नीला गुण आला नाही. अखेर डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक इश्वर चव्हाण करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here