लग्नाचे आमिष दाखवत महिलेसोबत विविध लॉजेसवर संबंध  

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत भडगाव येथील महिलेवर जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव येथील लॉजेसवर नेवून शरीर संबंध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजवान जैनुद्दीन शेख असे गुन्हा दाखल झालेल्या खासगी चालक म्हणून काम करणा-या इसमाचे नाव आहे.  

भडगाव येथील महिलेने पाचोरा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार तिला चाळीसगाव येथील रहिवासी असलेल्या रिजवान शेख याने लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिला पाचोरा येथील रेल्वे स्टेशननजीक असलेल्या क्षुधाशांती, जळगाव येथील हॉटेल विलास आणि चाळीसगाव येथील एका लॉजवर नेवून शरीरसंबंध प्रस्थापीत केले. सन 2008 ते सन 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. एवढा कालखंड उलटल्यानंतर शिवणकाम करणा-या महिलेने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.  इमरानचे दोन भाऊ आणि इमरानची पत्नी आदींनी आपल्याला शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी वेळोवेळी दिल्याने घाबरुन आपण आजपर्यंत फिर्याद दिली नाही असे महिलेचे म्हणणे आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here