विवाहीतेची गळफास घेत आत्महत्या – अकस्मात मृत्यूची नोंद  

जळगाव : माहेरी आलेल्या विवाहीतेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. वैशाली जयदेव भिल असे 12 सप्टेबर रोजी गळफास घेणा-या विवाहितेचे नाव आहे. शिरपूर तालुक्यातील काकडदा हे सासर असलेली वैशाली रक्षाबंधनाच्या निमित्ताने माहेरी भोलाने या गावी आलेली होती.

12 सप्टेबरच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास वैशाली घरातील छताच्या लोखंडी पाईपाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. नातेवाईकांच्या मदतीने तिला खाली उतरवण्यात आले होते. खासगी वाहनाने तिला भोलाने येथून धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी तिला मयत घोषित केले. याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला दाखल अकस्मात मृत्यूचा तपास पोलिस उप निरीक्षक अमर वसावे करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here