७ – ८ सप्टेंबरला पावसाळी अधिवेशन

On: August 25, 2020 8:23 PM

मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आगामी ७ व ८ सप्टेंबरला होत आहे. कामकाज सल्लागार समितीने आज निर्णय घेतला आहे. हे अधिवेशन केवळ दोन दिवस राहणार आहे.यावेळी दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन तपासणी केली जाणार आहे.

प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून बचावासाठी एक सुरक्षा किट देण्यात येईल. कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश राहणार नाही. तसेच सदस्यांच्या स्विय सहायकांना प्रवेश राहणार नाही. असे असले तरी स्विय सहायकांची स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. वाहनचालकांना बसण्याची व नाश्ता, चहापाणी अशी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment