वेश्या व्यवसायाची माहिती घेण्यास आलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातून जाणा-या महामार्गावरील एका ढाब्यावर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री करण्यासाठी आलेल्या तरुणासह त्याच्या मित्राला  लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामार्गावरील या ढाब्यावर वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समजल्यानंतर घोडसगव ता. मुक्ताईनगर येथील एक तरुण आपल्या मित्रासह आला होता. आलेल्या दोघांना घोडसगाव ता. मुक्ताईनगर येथील पाचही जणांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हातातील चाकू व लोखंडी पाईपाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दुखापत केली. याशिवाय या तरुणाच्या कब्जातील विस हजार रुपये जबरीने काढून घेतल्याची तक्रार आहे. मोटार सायकलचे नुकसान व जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे.

मुक्ताईनगर महामार्गावरील छुपा वेश्या व्यवसाय या घटनेच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. ट्रक चालक अशा ढाब्यांवर आपली दोन्ही स्वरुपाची भुक पुर्ण करण्यासह मद्यपान करत असल्याचे या निमित्ताने  म्हटले जात आहे. हा प्रकार रस्ते अपघाताला आमंत्रण देणारा असल्याचे देखील या घटनेच्या निमीत्ताने म्हटले जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here