जळगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील बारा गुन्हेगारांना आज शहरात बंदी

जळगाव : जळगाव पोलिस दलाच्या गुन्हे पटलावरील बारा गुन्हेगारांना आज 28 सप्टेबरच्या मध्यरात्री  बारा वाजेपासून पुढील चोवीस तासांपर्यंतच्या कालावधीत जळगाव शहर बंदी घालण्यात आली आहे. जळगाव शहरातील सार्वजनीक गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलिस दलाने ही उपाययोजना केली आहे. हे सर्व बारा गुन्हेगार एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी आहेत.

आकाश अरुण दहेकर, रा. जाखनीनगर, कंजरवाडा जळगाव, पियुष उर्फ वाघ्या मुकुंदा ठाकुर रा. तुकारामवाडी जळगाव, रोहित उत्तम भालेराव रा. कासमवाडी ता जि जळगाव, रोशन उर्फ बबलु हिलाल धनगर, रा. सम्राट कॉलनी जळगाव, खुशाल उर्फ काल्या बाळु मराठे रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी जळगाव, मायकल उर्फ कन्हैया नेतलेकर रा. संजयगांधीनगर, कंजरवाडा जळगाव, बिजासन फकीरा घुगे रा. मेहरुण तांबापुरा जळगाव, सनी उर्फ सुनिल महादु सोनवणे रा. तांबापुरा जळगाव, लोकेश चंद्रकांत दडगव्हाळ, रा. अयोध्यानगर जळगाव, विजय गुलाब मराठे रा. सुप्रिम कॉलनी जळगाव, कृष्णा रघुनाथ भालेराव रा. कुसुबा ता जि जळगाव, अजय विजय भिल रा. शिरसोली ता जि जळगाव अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.

गणेशोत्सव शांततेत आणि भयमुक्त वातावणात पार पडावा यासाठी एमआयडीसी पोलिस स्टेशनकडून या गुन्हेगारांना जळगाव शहरात प्रवेशबंदीचा प्रस्ताव तयार करुन वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला होता. उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधळकर जळगाव भाग जळगाव यांनी सीआरपीसी 144 (2) प्रमाणे आदेश काढुन या सर्व बारा गुन्हेगारांना जळगाव शहरात प्रवेश करण्यास मनाई आदेश काढला आहे. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. दिपक चौधरी, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल कोळी आदींनी या प्रस्ताव तयार करण्याकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here