चॉपर आणि चाकूने हल्ला करणा-या दोघांना अटक

जळगाव : चॉपर आणि चाकूने हल्ला करुन दोघांना जखमी करणा-या दोघा हल्लेखोरांना एमआयडीसी गुन्हे शाखेच्या शोध पथकाने अटक केली आहे. श्रीकांत मोहन धनगर आणि दुर्गेश कैलास परदेशी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा हल्लेखोरांची नावे आहेत. जळगाव तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी मिथुन फकीरा परदेशी यांच्या घरासमोरुन दोघे हल्लेखोर मोटार सायकलने इकडून तिकडे चकरा मारत होते. कुणाला धक्का लागेल इकडून तिकडे चकरा मारु नका असे मिथुन परदेशी यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटार सायकलवरील श्रीकांत धनगर आणि दुर्गेश परदेशी या दोघांनी मिथुन परदेशी यांच्यावर हल्ला करत शिवीगाळ केली.

श्रीकांत धनगर याने चॉपर काढुन मिथुन परदेशी यांच्या पाठीवर आणि हातावर दुखापत केली. दुर्गेश परदेशी हातातील चाकूने मिथून परदेशी यांच्या सोबत असलेला विशाल फकिरा परदेशी याच्या पाठीवर हल्ला केला. या हल्ल्यात मिथुन आणि विशाल हे दोघे जखमी झाले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला श्रीकांत आणि दुर्गेश या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील दोघा हल्लेखोरांना पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ. गफ्फार तडवी आणि संदीप धनगर यांनी शिताफीने अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here