अल्पवयीन मुलींचे अपहरण वाढले जळगाव जिल्ह्यात

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना सध्या समोर येत आहेत. 29 सप्टेबर या एकाच दिवशी तिन आणि 26 सप्टेबर रोजी एक अशा तिन अपहरणांच्या घटनांची पोलिस दप्तरी नोंद घेण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या समोर येत असलेल्या घटना या निश्चितच चिंतनीय असल्याचे म्हटले जात आहे.

धरणगाव येथील तेरा वर्ष वयाच्या मुलीचे 29 सप्टेबर रोजी दुपारी तिन वाजेच्या सुमारास अपहरण झाले आहे. मैत्रीणीच्या घरी गळ्यातील हार देवून येते असे सांगून घरातून गेलेली ही मुलगी घरी आली नाही. त्यामुळे अज्ञात इसमाविरुद्ध फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे.कॉ. गजानन महाजन पुढील तपास करत आहेत. जळगाव एमआयडीसी परिसरातील जोशीवाडा मेहरुन भागातील तेरा वर्ष वयाच्या मुलीचे 29 सप्टेबर रोजी अपहरण झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उप निरीक्षक रुपाली महाजन करत आहेत. खानापूर ता. रावेर येथील साडे सतरा वर्ष वयाच्या मुलीस कुणीतरी काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उप निरीक्षक दिपाली पाटील पुढील तपास करत आहेत. शेंदुर्णी ता. जामनेर येथील पंधरा वर्ष वयाच्या मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार शशिकांत पाटील पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here