एमआयडीसी पोलिस स्टेशनसह दुरक्षेत्र परिसरात स्वच्छता मोहीम

जळगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रीय स्वच्छता अभियानांर्तगत संस्थात्मक व सार्वजनिक स्तरावातील स्वच्छता मोहीमेत एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या पुर्वदिवशी विशेष ‘स्वच्छांजली’ मोहिम राबवण्यात आली. या मोहीमेचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.  

एमआयडीसी पोलिस स्टेशनसह म्हसावद, कंवर नगर आणि इच्छादेवी दूरक्षेत्र परिसरात देखील स्वच्छता मोहिम राबवत श्रमदान करण्यातआले. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, निलेश गोसावी, रूपाली महाजन, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र उगले, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवदास नाईक, सुनील सोनार, गफ्फार तडवी, संजय धनगर, रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, किरण पाटील, योगेश बारी, मंदार पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर, पवन कुमावत, पंकज पाटील, साईनाथ मुंडे, सतीश गर्जे, तुषार गिरासे, अतुल पाटील, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे आदींनी श्रमदान करत स्वच्छता मोहीमेत सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here