सरपंच पदाचा वाद बनला आखाडा – प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 24 जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : तुमच्यामुळे आमचे सरपंचपद गेले असा वाद घालत सरपंच महिलेच्या पतीसह मुलगा आणि दोघे अशा चौघांना लाठा – काठ्या, सळई व लोखंडी पाईपाने मारहाण करत प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एकुण चोविस जणांविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्री प्र. उ. ता. पारोळा या गावी मारोती मंदीराच्या समोर 28 सप्टेबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. पुष्पा रामकृष्ण पाटील या सरपंच महिलेच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील पिंप्री प्र. उ. या गावच्या महिला सरपंच पुष्पा पाटील यांचे पती रामकृष्ण गंभीर पाटील, मुलगा मयुर रामकृष्ण पाटील तसेच प्रमोद रामलाल पाटील व त्यांचा मुलगा प्रेम प्रमोद पाटील अशा चौघांवर हा प्राणघातक हल्ला झाला. तुमच्यामुळे आमचे सरपंचपद गेले आता यांचा काटा काढू असे म्हणत चोवीस जणांनी लाठ्या काठ्या, लोखंडी पाईप व सळईचा वापर करत हा हल्ला केला. दरम्यानच्या घटनेत सरपंच महिलेचा विनयभंग झाल्याचा देखील प्रकार घडला.

सुनिल रामा पगारे, रामभाऊ चिंतामन भिल, रणजीत मोतीलाल भिल, राजु दादाभाऊ भिल, विजय रविंद्र मालचे, राजु भिवसन भिल, अजय नाना भिल, अविनाश नाना भिल, गोपाल आबा भिल, अजय दिलीप गायकवाड, रोहित सिकंदर भिल, शैलेश भगवान पगारे, विशाल पंडीत भिल, राहुल पंडीत भिल, प्रविण पंडीत भिल, अनिल रणजित भिल, भैय्या हिरामण पाटील, भिकन बारकु पगारे, संदीप महादू पगारे, पिंटू रोहीदास भिल, खंडेराव रामभाऊ भिल, शैलेश रामा पगारे, अर्जुन रामा पगारे, सचिन दयाराम पगारे (सर्व रा. प्लॉट भाग पिंप्री प्र. उ. ता. पारोळा) आदींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अमरसिंग विसावे करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here