उलटलेल्या टॅंकरमधील रिफाइंड ऑईलची चोरी

जळगाव : ताब्यातील टॅंकर अचानक उलटून खाली पडल्याने त्यातील सोयाबीन रिफाईंड ऑईलची चोरी करणा-या अज्ञात इसमांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संधीचा गैरफायदा घेण्याचा हा प्रकार म्हटला जात आहे.

दुर्गाराम गोगाराम जाट हा चालक सोयाबीन रिफाईंड ऑईल त्याच्या ताब्यातील टॅंकरद्वारे (जीजे 12 बीएक्स 9325) भुसावळ शहरालगतच्या महामार्गाने वाहून नेत होता. दरम्यान पंजाब खालसा हॉटेल सुंदर नगर नजीक हे टॅंकर अचानक उलटून खाली पडले. त्यामुळे टॅंकरमधील 39 हजार 750 किलो ऑईल जमीनीवर पडले. ते ऑईल परिसरातील अज्ञात इसमांनी संधी मिळताच चोरुन नेले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. अमोल पवार पुढील तपास करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here