गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेतून महात्मा गांधीजींना आदरांजली

जळगाव दि. २ प्रतिनिधी– येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. कांताई सभागृह येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी जळगाव शहरासह तालुक्यातील १७ शाळांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल ने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत सहभागी शाळांनी मराठी व हिंदी भाषेतील देशभक्तीपर गीत सादर केले. सहभागी संघातील विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्या संघांना अनुक्रमे रु. ११ हजार, ७ हजार, ५ हजार व उत्तेजनार्थ रु. २ हजाराची तीन रोख पारितोषिके देण्यात आले.

स्पर्धेचा निकाल – ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल (प्रथम), ए. टी. झांबरे विद्यालय (द्वितीय), विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल (तृतीय) क्रमांक तर उत्तेजनार्थ श्रीमती ब. गो शानबाग विद्यालय सावखेडा, अनुभूती इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल, बाल विश्व इंग्लिश व सेमी इंग्लिश माध्यम शाळा दादावाडी क्रमांकाने पारितोषिक मिळाले. ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या स्कूलच्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक असे स्वरूप होते. परीक्षक म्हणून दीपक चांदोरकर, संपदा छापेकर, आदिती कुलकर्णी यांनी काम बघितले.

या शाळेचा सहभाग – गांधीतीर्थ देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेत शहरासह तालुक्यातील १५ शाळांनी सहभाग नोंदविला यामध्ये ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल, या.दे.पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय मोहाडी, स्वातंत्र्यसैनिक पंढरीनाथ थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मिल्लत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसोली, सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली, कै. ॲड अच्युतराव अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळांनी ही सहभाग नोंदविला. प्रत्येक शाळेतील संघांनी देशभक्तीपर गीत सादर करून महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, सुधीर पाटील, विश्वजीत पाटील, चंद्रशेखर पाटील, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, मयूर गिरासे, विक्रम अस्वार यांच्यासह गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here