स्व. किरण दहाड स्मृती टी-२० स्पर्धेत मोर्या एकादश, भुसावळ क्रिकेट संघ विजयी

जळगाव दि.७ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दुसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-20 स्पर्धेतील आजचा दुसरा दिवसाचा प्रथम सामना खदिम क्रिकेट क्लब ग्रीन विरूद्ध मोर्या एकादश यांच्यात झाला. मोर्या एकादश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व खदिम क्रिकेट क्लब ग्रीन यांना पाचारण केले.

खदिम क्रिकेट क्लब ग्रीन संघ १६ व्या षटकात ८५ धावांत गारद झाला. त्यात शाहरूख शेख २० धावा, मासूम शेख १७, अशिफ देशमूख १० यांनीच फक्त दुहेरी धावसंख्या गाठली. मोर्या एकादश संघातर्फे चारूदत्त नन्नवरे यांने दोन गडी बाद केले तर जय चावरिया, संकेत चौधरी, शिव पुरोहित, अक्षय शर्मा व दिपक सोनवणे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. मोर्या संघाने मिळालेल्या ८६ धावांचे लक्ष्य १६ व्या षटकात पाच गडी गमावून गाठले. आणि पाच गडी राखून दणदणीत विजय मिळविला. यात शिव पुरोहीत याने नाबाद ३२ धावा केल्या. त्याला जितेंद्र नाईक १७, चारूदत्त नन्नवरे १६, दिपक सोनवणे १० यांनी मोलाची साथ देत संघाला विजयी केले. खदिम संघातर्फे संदिप हंसकर याने ४ गडी बाद केले. या सामन्यात सामनावीर चारूदत्त नन्नवरे याला सुरक्षा विभागातील अधिकारी श्री. भुसांडे यांच्याहस्ते देण्यात आले.

दुसरा सामना राजमुद्रा एकादश पाचोरा विरूद्ध भुसावळ क्रिकेट असोसिएशन यांच्यात झाला. भुसावळ क्रिकेट असोसिएशनने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. निर्धारित २० षटकात सात गडी बाद १६३ धावा केल्या. या नाबाद राहत लोकेशने ४८ धावा, मनिष चव्हाण ४८ धावा तर मोहित मेहरा व प्रतीक सुपले याने प्रत्येक ११ धावांचे योगदान दिले. राजमुद्रा संघातर्फे अमोल जाधव याने तीन याने परेश बागुल २, आशिष व अजय राठोड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. १६४ धावांचे लक्ष्य गाठताना राजमुद्रा क्रिकेट संघ २० षटकात १०५ धावाच करू शकला. राजमुद्रा संघातर्फे परेश बागुल १७, अक्षय सोनवणे १५, स्वप्नील गवळी १४, दिनेश पाटील १० असे योगदान दिले. भुसावळ संघातर्फे निलेश बोरीकर तीन बळी, प्रतिक शुक्ले दोन बळी, प्रशांत पाटील दोन बळी तर तेजेश झोपे, मनिष चौहान, तन्जील खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवीला. अशा प्रकारे भुसावळ संघ ५८ धावांनी विजयी झाला. यात त्यांच्या कर्णधार मनिष चौहाण याला सामानावीर तन्वीर अहमद यांच्याहस्ते पुरस्काराने सन्मानीत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here