बहिणीच्या मित्राला तिच्या भावाने समजावले —– फोटोच्या बळावर त्याने शरीरसंबंध वाढवले

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): शालेय जीवनातच प्रिया (काल्पनिक नाव) हिची दानिश तडवी नावाच्या मुलासोबत ओळख झाली. इयत्ता नववीत असतांना प्रिया आणि दानिश हे दोघे एकमेकांना परिचीत झाले. जळगाव शहराच्या मेहरुण परिसरातील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असतांना दोघांना भिन्नलिंगी आकर्षण निर्माण झाले. दोघे एकमेकांना चोरुन लपून भेटू लागले. एके दिवशी प्रियाच्या भावाने दोघांना सोबत बोलतांना पाहिले. आपल्या बहिणीसोबत बोलतांना बघून प्रियाच्या भावाला संताप आला. संतापाच्या भरात त्याने दोघांना मारहाण केली. यापुढे माझ्या बहिणीला भेटायचे नाही. यापुढे तिच्यासोबत बोलतांना मला दिसला तर याद राख असा सज्जड दम प्रियाच्या भावाने दानिशला दिला. प्रियाच्या भावाचा रुद्रावतार बघून दानिश तेथून पळून गेला.

त्यानंतर काही दिवस प्रिया आणि दानिश हे दोघे एकमेकांना भेटले नाही. अकरावीत शिक्षण घेण्यासाठी शहरातील एम.जे.कॉलेजमधे दानिशने प्रवेश मिळवला. प्रियाने मात्र मेहरुण परिसरातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी आणि बारावीसाठी प्रवेश घेतला. तरीदेखील दानिशचे प्रियाला भेटण्यासाठी मन अधीर होत असे. तो चोरुन लपून प्रियाला भेटण्यासाठी तिच्या महाविद्यालयाभोवती घिरट्या घालत होता. एके दिवशी त्याने तिला गाठले. त्यामुळे पुन्हा दोघांमधे प्रेमाचा अंकुर फुलला.

एके दिवशी दानिशने प्रियाला गोड बोलून कांताई डॅम परिसरात नेले. त्याठिकाणी निर्मनुष्य परिसर बघून त्याच्यातील वासना उफाळून आली. अकरावीत शिकणा-या प्रियाची त्याने छाती दाबून तिचा किस घेतला. शालेय जीवनात प्रथमच एका तरुणाने तिची छाती दाबून किस घेतला होता. तो प्रसंग तिला अनपेक्षीत होता. दानिशचे हे कृत्य तिला नकोसे असले असले तरी त्याचा स्पर्श आणि अवयव दाबल्याने तिच्या अंगात शहारे निर्माण झाले. पुढच्याच क्षणी त्याने तिच्यासोबत त्याच्या मोबाईलमधे एक फोटो काढला. शालेय जीवनातच त्याने प्रियाला नादी लावले.

त्यानंतर दानिशला तिच्या स्पर्शाची जणू काही चटकच लागली. यावेळी बारावीचे शिक्षण घेणा-या प्रियाला तो एके दिवशी मेहरुण तलावाच्या ट्रॅकवर घेवून गेला. यावेळी त्याने तिला झाडाझुडूपात नेले. झाडाझुडूपात त्याने बळजबरी तिची जींन्स पॅंट काढली. तु माझ्यासोबत फिजीकल संबंध ठेव, मी कुणालाच काही सांगणार नाही असे गोड बोलून त्याने तिच्यसोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. यावेळी देखील त्याने तिच्यासोबत त्याच्या मोबाईलमधे फोटो काढून घेतले. हा प्रकार तु कुणाला सांगितला तर मी हे फोटो व्हायरल करेन अशी त्याने तिला धमकी दिली. त्याची धमकी ऐकून ती घाबरली. तिने हा प्रकार घरात कुणालाही सांगितला नाही.

बघता बघता काळ पुढे सरकला. प्रियाने बीएससी च्या प्रथम वर्षासाठी शहरातील एका बड्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. आता ती अठरा वर्षाची महाविद्यालयीन तरुणी झाली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिचे महाविद्यालय सुरु झाले. ती नियमीत महाविद्यालयात जावू लागली.

एके दिवशी ती तिच्या मैत्रीणीसोबत बोलत असतांना दानिश त्याठिकाणी आला. त्याने देखील तिच्या वर्गातच प्रवेश घेतल्याचे तिला त्याच्या बोलण्यातून समजले. दोघे एकाच महाविद्यालयात असल्याने दोघांना एकमेकांना भेटण्याचे जणू काही रान मोकळे झाले होते. तो तिला महाविद्यालयाच्या बगीच्यात नेवू लागला. याठिकाणी तो तिच्या सर्वांगावर हात फिरवण्याचे काम करु लागला. ज्या महाविद्यालयात विद्या ग्रहण करण्यासाठी विद्यार्थी येतात त्या परिसरातील बगीच्यात तो तिच्या शरीरावर हात फिरवण्याचे काम करु लागला. तिच्या नाजुक अवयवांना हात लावण्याचे त्याचे धाडस वाढले होते. तु जर हा प्रकार कुणाला सांगितला तर मी आपले फोटो व्हायरल करेन या एकाच धमकीवर तो तिला स्पर्श आणि चाळे करत होता.

त्यामुळे तीने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. बघता बघता त्याचे धाडस वाढत गेले. तो तिला व्हिडीओ कॉल करुन अंगावरील कपडे काढण्यास सांगू लागला. नकार दिल्यास जोडीने काढलेले फोटो व्हायरल करण्याची त्याची धमकी ठरलेली होती. त्याच्या धमकीला घाबरुन ती व्हिडीओ कॉल दरम्यान कपडे काढू लागली.

3 ऑक्टोबर रोजी महाविद्यालय परिसरात ती उभी असतांना दानिश तिच्या पाठीला स्पर्श करत असतांना प्रियाची मोठी बहीण त्याठिकाणी आली. तिने हा प्रकार बघून त्याच्यावर संताप व्यक्त केला. प्रियाच्या मोठ्या बहिणीने त्याला रागावल्यानंतर तो तेथून पळून गेला. त्यानंतर प्रियाने त्याच्या आणि तिच्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार मोठ्या बहिणीला कथन  केला.

प्रियाच्या मोठ्या बहिणीने तिला सोबत घेत एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले. मोठ्या बहिणीसमक्ष प्रियाने सर्व प्रकाराची हकीकत पो.नि. जयपाल हिरे यांना कथन केली. पो.नि. जयपाल हिरे यांनी प्रियाची सर्व आपबिती ऐकून घेत तिच्या मोठ्या बहिणीसमक्ष तिची फिर्याद नोंदवून घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उप निरीक्षक रुपाली महाजन यांना देण्यात आला. महिला पोलिस उप निरीक्षक रुपाली महाजन यांच्यासह गुन्हे शोध पथकातील हे.कॉ. अल्ताफ पठाण, पो. ना. योगेश बारी, मुकेश पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे आदींनी संशयीत आरोपी दानिश तडवी याची शोध मोहीम सुरु केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच त्याची उचलाबांगडी करत त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उप निरीक्षक रुपाली महाजन व त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here