सहायक तलाठयास धक्का मारुन ट्रॅक्टर नेणा-याविरुद्ध गुन्हा

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेले ट्रॅक्टर घेऊन जाणा-याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय समाधान कोळी (रा. निमखेडी – जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभे करण्यात आलेले ट्रॅक्टर अजय समाधान कोळी याने म्हसावदचे सहायक तलाठी आकाश विजय काळे यांना धक्का मारुन नेले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आकाश काळे यांनी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक शांताराम देशमुख करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here