भडगाव पोलिस स्टेशनचे दोघे निलंबित?

जळगाव : भडगाव पोलिस स्टेशनचे दोघे पोलिस कर्मचारी निलंबित झाल्याचे वृत्त असले तरी त्याला अधिकृत दुजोरा दिला जात नसून वृत्त खरे असल्याचे म्हटले जात आहे. भडगाव पोलिस स्टेशनमध्ये दोघा कर्मचा-यांपैकी एकाचा वाढदिवस अवैध व्यावसायिकांच्या सोबतीने साजरा केल्याचे कारण या निलंबनामागे दडले असल्याचे देखील म्हटले जात आहे. दोघा पोलिस कर्माचा-यांची नावे “क्राईम दुनिया” च्या हाती लागली असली तरी ती नावे उघड न करण्याची दक्षता घेतली जात आहे.

भडगाव पोलिस स्टेशनच्या दोघा निलंबित पोलिस कर्मचा-यांनी एका कर्मचा-याचा वाढदिवस काही दिवसांपूर्वी एका अवैध व्यावसायिकासोबत साजरा केल्याचे देखील या निमित्ताने म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here