एमपीडीए कायद्याअंतर्गत दोघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव : एमपीडीए कायद्याखाली दोघा गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. अजय उर्फ सोनू मोहन अवसरमल (रा. भारत नगर मामाजी टॉकीजजवळ भुसावळ) आणि तन्वीर शेख मुक्तार (रा. जुना पारधी वाडा अमळनेर) अशी दोघा गुन्हेगारांची नावे आहेत. भुसावळ येथील अजय अवसरमल याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ, जीआरपी भुसावळ, सावदा, वरणगाव आदी पोलिस स्टेशनला आर्म अ‍ॅक्ट, चोरी आदी प्रकारचे संघटीत स्वरुपात केलेले एकुण पंधरा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई देखील झाली आहे. त्याची मध्यवर्ती कारागृह मुंबई येथे रवानगी करण्यात आली आहे.

अमळनेर येथील तन्वीर शेख मुक्तार याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला एकुण तेरा गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई देखील झाली आहे. त्याची मध्यवर्ती कारागृह ठाणे येथे रवानगी करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांचे सहकारी सहायक फौजदार युनुस शेख इब्राहीम, हे.कॉ. सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, पो.कॉ. इश्वर पाटील आदींनी या प्रस्तावाचे कामकाज हाताळण्याकामी सहकार्य केले.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here