दोन जीवंत काडतुस, गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

जळगाव : भुसावळ शहरातून दोन जीवंत काडतुस असलेल्या गावठी कट्ट्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. भुसावळ उप विभागीय कार्यालय पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. प्रकाश सुभाष धुंदे (रा. नाडगाव ता. बोदवड) आणि तौसिफ असलम तडवी (रा. अयान कॉलनी खडका चौफुली भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

सुरुवातीला ताब्यात घेतलेल्या प्रकाश धुंदे याने आपण हा कट्टा आणि जीवंत काडतुस तौसिफ तडवी याच्याकडून विकत घेतल्याचे कबुल केले. त्यामुळे दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी  भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गु.र.नं. 511/2023 आर्म अॅक्ट 3/25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोहेकॉ सुरज पाटील, पोना संकेत झांबरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे हे.कॉ. महेश चौधरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here