पुतणीला मित्रासोबत डबलसीट पाहिले काकाने — अडवणा-या काकाला लाथ मारुन पाडले मित्राने    

जळगाव : पुतणी तिच्या मित्रासोबत मोटार सायकलवर डबलसिट जात असल्याचे बघून दोघांना अडवणा-या काकाला मारहाणीसह त्यांच्या मोटार सायकलचे नुकसान केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील खडका येथील घटनेत जखमी काकाने पोलिसांना दवाखान्यात दिलेल्या जवाबानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडका येथील एक तरुणी तिच्या मित्रासोबत डबलसीट जात होती. त्याचवेळी त्या तरुणीचे काका त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल खडका चौफुलीवर वाशिंग करण्यास जात होते. दरम्यान काकाचे लक्ष पुतणीकडे गेले. आपली पुतणी परक्या तरुणासोबत जात असल्याचे बघून काकाने दोघांना ओव्हरटेक करुन अडवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला अडवल्याचा राग आल्याने पुतणीच्या मित्राने तिच्या काकाला लाथ मारुन खाली पाडले. त्यात तरुणीचे अर्थात पुतणीचे काका जखमी झाले व त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलचे नुकसान झाले. तरुणीच्या काकाने दवाखान्यात उपचार घेत असतांना पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार संबंधीत तरुणाविरुद्ध दुखापत केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. प्रेमचंद सपकाळे करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here