मध्यरात्री भुसावळ शहरात खूनाचा थरार

जळगाव : सर्वत्र दसरा आणि नवरात्रोत्सवानिमीत्त दांडीयाचा उत्साह आटोपल्यानंतर मध्यरात्री दिड वाजेनंतर भुसावळ शहरातील गरुड प्लॉट भागात एका इसमाचा खून झाल्याची घटना घडली. दिलीप जोनवाल असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. गरुड प्लॉट भागातील दोस्ती मंडळा नजीक हा खूनाचा प्रकार घडला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

खून झालेला इसम दिलीप जोनवाल हा महात्मा फुले नगर परिसरातील रहिवासी होता. पुर्व वैमनस्यातून हा खून झाला असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय मयत हा आरटीआय कार्यकर्ता असल्याचे देखील म्हटले जात आहे. अधिकचा तपास भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here